पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त

सीमा सुरक्षा दलाची सीमाभागात धडक कारवाई

पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त

Drug syringe and cooked heroin on spoon

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) सीमाभागात मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा दलाने पंजाब सीमेवर तब्बल ३७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. यापूर्वीही सुरक्षा दलाने पंजाबच्या अमृतसरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन गोळीबार करून पाडले होते. या कारवाई दरम्यान ड्रोनने वाहून आणलेला तीन किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला होता.

भारतीय हद्दीत गुरुवार, ८ जून रोजी रात्री ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सतर्क जवानांनी गोळीबार करून ड्रोन परतावून लावले. तसेच त्यातून फेकण्यात आलेले ३७ कोटी रुपयांचे हेरॉईनही जप्त केले.

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने मध्यरात्री अमृतसर सीमेवर घुसखोरी केली. जवानांनी प्रतिउत्तर म्हणून ड्रोनचा आवाज ओळखून गोळीबार सुरू केला. दरम्यान, ड्रोनने मोठे पॅकेट टाकल्याचा आवाज आला. गोळीबार होताच ड्रोन माघारी फिरला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. रात्रीच्या सुमारास परिसर सील करून शोधमोहीम राबविण्यात आली आहे.

अमृतसरच्या सीमेवरील राय गावच्या शेतात बीएसएफ जवानांना पिवळ्या रंगाचे एक मोठे पाकीट सापडले. हे पाकीट पिवळ्या टेपने झाकलेले होते. त्याला एक हुक देखील जोडलेला होता. या पाकिटात पाच छोटी पाकिटे आढळून आली. त्यातील हेरोईनचे वजन ५.२५ किलो असून आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे ३७ कोटी इतकी आहे.

हे ही वाचा:

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

निर्मला सितारामन यांच्या मुलीचा अत्यंत साधेपणाने विवाह

लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार

पाकिस्तानी तस्करांकडून ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असून नुकतेच अमृतसर सीमेवर ड्रोन पाडण्यात आले होते. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन पाडले असून पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले असून लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

Exit mobile version