25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुंद्रा बंदरावर ३७६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

मुंद्रा बंदरावर ३७६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

Google News Follow

Related

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ एका कंटेनरमध्ये दडवून ठेवलेले हेरॉईन दहशतवाद विरोधी पथकाने सोमवार, ११ जुलै रोजी जप्त केले आहे. तब्बल ७५ किलो हेरॉईन जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात तीनशे कोटीहून अधिक किंमत आहे. या संबंधित माहिती कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिस महासंचालक आशिष भाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून कपडे घेऊन येणारा एक कंटेनर फ्रेट स्टेशनवर थांबवण्यात आला होता. भारतात एवढी मोठी कापडाची बाजारपेठ असतानाही हा कंटेनर आल्याने पोलिसांना याचा संशय आला. त्यामुळे कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कंटेनरमध्ये कापडात गुंडाळलेले अमली पदार्थ आढळून आले. या कंटेनरमधून ७५.३ किलो वजनाचे हेरॉईन जप्त केले असून, त्यांची आंतराष्ट्रीय बाजारी किंमत ३७६.५ कोटी रुपये आहे.

हे ही वाचा:

राज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

हे कंटेनर संयुक्त अरब देशातून भारताकडे पाठवले होते. त्यानंतर हे कंटेनर पंजाबमध्ये पाठवले जाणार होते. मुंद्रा बंदरावर १३ मे रोजी आलेल्या कंटेनरमध्ये कापडी गट्ट्यांमध्ये ड्रग सापडले आहेत. हे कापड संयुक्त अरब स्थित ग्रीन फॉरेस्ट जनरल ट्रेडिंग ह्या कंपनीने पाठवलेले होते. कंटेनर मधील ५४० कापडी गठ्ठयाची तपासणी केली असता ६४ गठ्ठया मध्ये हेरॉईन पावडर आढळून आली आहे, अशीही माहिती आशिष भाटीया यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा