मुंबई विमानतळावर अदिस अबाबाहुन येणाऱ्या जोडप्याला अटक करण्यात आली आहे . हे जोडपं त्यांच्या सामानात ८ किलो हेरॉईन लपवून त्याची तस्करी करण्यासाठी मुंबईत आले होते. त्याच्या म्हणण्या प्रमाणे हे अमली पदार्थ नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी मागवण्यात आले होते.
ह्या दोघांची नावं रोनाल्ड मकुंबे (५६) आणि त्याची पत्नी मकुंबे लॉव्हनेस (५२)असून हे मूळचे झिम्बाब्वेचे आहेत. हे प्रवासी अदिस अबाबाहुन आलेले होते. ह्या दोघांनी हे अमली पदार्थ केप टाऊन मधल्या एका शेरॉन नावाच्या महिलेकडून घेतले. ह्या तस्करीच्या बदली तिने त्यांना ५०० डॉलर देण्याचे सांगितले. तिने हे पढार्थ मुंबईला पोहोचवण्याचे काम त्या जोडप्याला दिलं. महिलेने त्यांना मुंबईची तिकीट आणि पैसे देऊन रवाना केले. मुंबईला पोहोचल्यावर ह्यांचे सामान संशयास्पद असल्यामुळे ह्यांचे सामान जप्त करून तपासण्यात आले. तपासानंतर ह्यांच्या सामानात चॉकलेटी रंगाची पावडर सापडली. अधिकाऱ्यांनी ती पावडर तपासल्यानंतर ती पावडर हेरॉईन असल्याचे कळले आणि लगेचच ह्या जोडप्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सामानात ४ किलो हेरॉईनचे दोन पॅकेट सापडले. सुरुवातीला त्यांनी सर्व प्रश्नांची नकारात्मक उत्तरं दिली व गुन्हा कबुल करण्यास नकार दिला. पण त्या पावडरचा अहवाल दाखवल्यानंतर त्यांनी सत्य सांगितले. त्यांनी त्याच्या सामानात अमानी पदार्थ आणल्याचे कबुल केले आणि गुन्हा मान्य केला. ह्या गुन्ह्याबाबत महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) त्यांना अटक सुद्धा कारण्यात आली.
हे ही वाचा :
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल
पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!
शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहिती अनुसार हे फक्त हिमनगाचे टोक आहे. नव वर्षाच्या जल्लोषात जगाच्या कानाकोपऱ्यातून अमली पदार्थ येण्याची शक्यता आहे. म्हणूनच विमानतळाची सुरक्षा आता वाढवण्यात येणार आहे असे सूचित.