हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन मुंजाल यांच्या मालमत्तेवर टाच!

२४.९५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन मुंजाल यांच्या मालमत्तेवर टाच!

हिरो मोटोकॉर्पचे सीएमडी आणि चेअरमन असलेले पवनकांत मुंजाल यांची अंमलबजावणी संचालनालयाने नवी दिल्लीतील ₹ २४.९५ कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा २००२ च्या तरतुदींनुसार पवनकांत मुंजाल यांच्या तीन स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाकडून शुक्रवारी सांगण्यात आले की, हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन कांत मुंजाल यांची २४.९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार दिल्लीतील मुंजालच्या तीन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत,असे केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.पवनकांत मुंजाल हे हिरो मोटोकॉर्पचे सीएमडी आणि चेअरमन आहेत.

हे ही वाचा:

ससूनमधील पंचतारांकित सुविधांसाठी ललित पाटील मोजत होता १७ लाख रुपये

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

मुंजाल आणि इतरांविरुद्ध सीमाशुल्क कायदा १९६२ च्या कलम १३५ अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या फिर्यादी तक्रारीच्या आधारे ईडीने तपास सुरू केला , असे तपास संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

मुंजाल यांच्यावर ५४ कोटी रुपये परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याचा आरोप होता.तसेच मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावाने परकीय चलन जारी केले आणि त्यानंतर त्या पैशांचा वापर परदेशात वैयक्तिक खर्चासाठी केला, असे ईडीने तपासात उघड झाल्याचे सांगितले.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version