27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाआयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक

आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक

पाकिस्तानी हस्तकांना भारतीय लष्करी आस्थापनांची महत्त्वाची माहिती पुरवत होता

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानस्थित इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)या गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मोहम्मद रईस असे या आरोपीचे नाव असून तो कथितपणे त्याच्या पाकिस्तानी हस्तकांना भारतीय लष्करी आस्थापनांची महत्त्वाची माहिती पुरवत होता, असे एटीएसने रविवारी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोंडाच्या तारबगंज भागात राहणारा मोहम्मद रईस मुंबईत काम करत असताना अरमानच्या संपर्कात आला होता. अरमानने भारतातील मुस्लिम समुदायाच्या सदस्यांवर अत्याचाराचा आरोप करून त्याला भडकवण्याचा प्रयत्न केला, असे रईसने पोलिसांना सांगितले.

चौकशीदरम्यान रईसने दावा केला की, त्याने अरमानला सांगितले होते की, त्याला कामासाठी सौदी अरेबियाला जायचे आहे. त्यानंतर अरमानने रईसला सांगितले की तो त्याचा नंबर पाकिस्तानमधील एका व्यक्तीला देईल आणि त्याला भारताविरुद्ध हेरगिरी करण्यास प्रवृत्त करेल. रईसला त्या कामांच्या बदल्यात मोठी रक्कम दिली जाईल, असे सांगण्यात आले.

सन २०२२मध्ये रईसला परदेशी क्रमांकावरून कॉल आला होता. त्या व्यक्तीने स्वत:चे नाव हुसेन असे सांगितले आणि तो पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे सांगितले. रईसला लष्करी छावण्या आणि आस्थापनांची माहिती पाठवण्याचे काम देण्यात आले होते. रईसनेही त्याच्या मित्राला आणि इतर अनेकांना हेरगिरीसाठी अडकवले. त्या बदल्यात, रईसला पाकिस्तानी हेरांकडून १५ हजार रुपये मिळाले. एटीएसने सांगितले की, त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांना रईसच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे रईसला लखनऊ येथील एटीएस मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान त्याने हेरगिरीत सहभाग असल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली.

हे ही वाचा:

आशियाई ऍथलीट्स चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत भारत तिसरा

असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, हंडवारामध्ये ३३ वर्षांनी उघडली चित्रपटगृहे

शुभमन गिलला झुकते माप का दिले जात आहे?

लखनऊ एटीएस पोलिस ठाण्यामध्ये रईसच्या विरोधात भारतीय दंडसंहिता कलम १२१ अ (युद्ध पुकारणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे) आणि १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा