पाकिस्तानात ईशनिंदा केल्याच्या संशयावरून लोकांनी वीटांनी मारले

पाकिस्तानात ईशनिंदा केल्याच्या संशयावरून लोकांनी वीटांनी मारले

कुराणचा अपमान केल्याचा आरोप करत पाकिस्तानमध्ये एका मध्यमवयीन व्यक्तीला बेदम मारहाण करत ठार मारले आहे. संतप्त जमावाने न्यायालयाच्या निर्णयाचीही वाट न पाहता या मध्यमवयीन व्यक्तीची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करून त्याला जीवे मारले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानेवाल जिल्ह्यातील जंगल डेला गावात नमाजनंतर जमलेल्या एका व्यक्तीवर कुराणची काही पाने फाडल्याचा आरोप झाला. पण या आरोपाला तो नकार देत होता तरी जमावाने त्याचे ऐकले नाही.

प्रादेशिक स्टेशन प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली आरोपीला ईश्वरनिंदा केल्याच्या प्रकाराखाली ताब्यात घेतले. असे असतानाही संतप्त जमावाने आरोपीची पोलिसांपासून सुटका करून त्याला झाडाला बांधले आणि आरोपीला मरेपर्यंत विटांनी मारण्यात आले. पाकिस्तानी मीडियानुसार, ती व्यक्ती स्वत:ला निर्दोष मानत होती आणि समजावण्याचा प्रयत्न करत होती पण जमावाने त्याचे ऐकले नाही.

हे ही वाचा:

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

…म्हणून शिवसेना पंतप्रधानांचा द्वेष करते

हिजाब वादानंतर आता कर्नाटकात नमाज वाद?

गोव्यात ४० जागांसाठी भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी लावला जोर

याआधी डिसेंबरमध्ये श्रीलंकेतील एका अभियंत्यावर ईश्वरनिंदा केल्याचा आरोप करून त्याची हत्या करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी पोलीस महानिरीक्षक राव सरदार अली खान यांना या प्रकरणाचा अहवाल देण्यासाठी बोलावले आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान न्यायालायने एका महिलेला निंदनीय संदेश पाठवल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली होती.

पाकिस्तानच्या सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीजनुसार, १९४७ पासून पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचे एकूण एक हजार ४१५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये १८ महिला आणि ७१ पुरुष अशा एकूण ८९ जणांची ईशनिंदेच्या आरोपावरून हत्या करण्यात आली आहे. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत जी समोर आलेली नाहीत.

Exit mobile version