उत्तन समुद्रकिनाऱ्यावर सापडला शीर नसलेला महिलेचा मृतदेह

मॉर्निग वॉकला आलेल्या माणसाला दिसली बेवारस बॅग

उत्तन समुद्रकिनाऱ्यावर सापडला शीर नसलेला महिलेचा मृतदेह

मिरा भाईंदर जवळच्या उत्तन समुद्रकिनाऱ्यावर एका बॅगेत शीर नसलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निग वॉकसाठी आलेल्यांना ही बॅग दिसली. त्यानंतर पोलिस तिथे आले आणि त्यांनी ती बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात त्यांना हा मृतदेह आढळला.

 

या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले असून त्यातील शीर गायब आहे. हा मृतदेह २५ ते ३५ वर्षांच्या महिलेचा असल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. या महिलेच्या हातावर त्रिशूळ, डमरू आणि ओम लिहिलेले आहे. तिच्या उजव्या हातावर दोराही गुंडाळलेला आहे. डाव्या हातावर पांढरे ब्रेसलेट आहे. यावरून ती महिला हिंदू असावी असा अंदाज बांधला जात आहे. या महिलेने लाल रंगाचा टीशर्ट घातलेला आहे. तर हिरव्या रंगाच्या लेगिंग्स आहेत. या मृतदेहाचे पाय बांधलेले आहेत.

 

ही माहिती मिळाल्यानंतर उत्तर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. एफआयआर नोंदविण्यात आला असून ३०२ आणि २०१ कलमे लावण्यात आली आहेत. हा कुणाचा मृतदेह आहे, याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. पोलिस हे शोधत आहेत की, सदर बॅग ही इथे रस्तामार्गाने आणून टाकून देण्यात आली आहे की, ती पाण्याच्या मार्गाने इथे आणली गेली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, इथे समुद्रकिनाऱ्यावर सकाळी व्यायामासाठी आलेल्या एका माणसाला ही बॅग दिसली आणि त्यात हा मृतदेह असल्याचे त्याच्या लक्षात आले. डोके नसल्यामुळे पोलिसांना हा मृतदेह कुणाचा आहे, हे पटकन कळू शकलेले नाही.

हे ही वाचा:

राजस्थानमधील पावसाने तोडला १०० वर्षांचा विक्रम

बृजभूषणविरोधातील दोन एफआयआर आणि तक्रारीत गंभीर आरोप

बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम

सरकारी अधिकारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत

अशाच प्रकारे वाशिम येथे डोके नसलेला एक मृतदेह सापडला होता. त्यात मुख्तार खान नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. त्याने आपली मुलगी रईसाला ठार मारले होते. रईसा ही मानसिकदृष्ट्या आजारी होती. त्याला कंटाळून मुख्तारने ही हत्या केली होती. प्रारंभी मुख्तारने आपला गुन्हा मान्य केला नाही. पण पोलिसांनी त्याला दमात घेतल्यावर त्याने गुन्हा कबूल केला होता.

Exit mobile version