28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामात्याने केली तब्बल ५०० कोटींच्या आयफोनची तस्करी

त्याने केली तब्बल ५०० कोटींच्या आयफोनची तस्करी

सराईत गुन्हेगाराला डीआरआय कडून अटक

Google News Follow

Related

मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई झोनल युनिटने मेसर्स सालेचा इलेक्ट्रॉनिक इंकच्या मालकाला अटक केली आहे. या सराईत गुन्हेगाराने ५०० कोटी रुपये किमतीच्या ऍप्पल कंपनीच्या आयफोनची तस्करी केल्या प्रकरणी मालकाला अटक केली आहे. संबंधित आरोपी हा संगणकाचे व मोबाईलचे सुट्टे भाग आहे असे सांगून, आयफोनची तस्करी करत होता.

दिनेश सालेचा असे सराईत आरोपीचे नाव असून तो मुंबईतील ताडदेव परिसरातील रहिवासी आहे. सालेचा याने मागील वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो संकुल येथे महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत तीन हजार ६०० आयफोन जप्त केले होते. तसेच संबंधित कार्गो हाँगकॉग येथून भारतात आणण्यात आले होले. त्या पार्सलच्या आता मेमरी कार्ड सांगून हे आयफोन दडवून आणले होते. ५०० कोटी किमतीचे आयफोन आयात केले असून, सरकारी तिजोरीचे २०० कोटींहून अधिक नुकसान झाले असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाने संगीतले.

हे ही वाचा : 

अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त

व्यवसायातील नुकसानीमुळे ताज हॉटेलच्या १०व्या मजल्यावरून त्याने मारली उडी

आरोपी दिनेश सालेचा याला न्यायालयात हजर करण्यात आले असता बचाव पक्षाने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सालेचाला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा दावा आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने केला. डीआरआयचे विशेष सरकारी वकील अमित मुंडे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आणि आरोपीला सीमा शुल्क कायद्याच्या कलम १०८ अंतर्गत समन्स बजावण्यात आले होते आणि चौकशीसाठी डीआरआयच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा