पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!

पोलिस भरतीची तयारी सोडून पैशांची लालसेपोटी चोरी केली आणि आता जेलची हवा खात आहेत.

पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!

झटपट पैसे कमावण्याच्या मार्गेने वाट्टेल ती काम केली जातात मग मग ती खूण-दरोडे असुदेत की चोऱ्यामाऱ्या या सगळ्यांतून झटपट पैसे मिळतात हे मात्र नक्की…पोलीस आणि लष्करात भरती होणाऱ्या युवकांनी दुचाकी चोरायला सुरुवात केली. तसेच दोन मित्रांच्या साथीने तीन महिन्यात या चोरट्यांनी तब्बल १२ दुचाकी चोरले आहेत. तसेच या घटनेचा पर्दाफाश करत घाटकोपर पोलिसांनी तिघांनाही बेड्या घातले आहेत. तसेच या १२ दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

घाटकोपर पोलिसांनी जेरबंद केलेल्या अंकित मिश्रा (२१), किरण पाटील (२२) आणि गणेश सावंत (२१) अशी या आरोपींची नावे असून, किरण आणि गणेश हे एकाच गावचे असून मानखुर्द येथे राहतात तर अंकित मिश्रा हा या टोळीचा म्होरक्या आहे. तसेच अंकित हा काही दिवसांपूर्वी मानखुर्द येथील केकच्या दुकानात कामाला असताना त्या दोघांशी ओळख झाली. त्यापैकी गणेश हा येस बँकेमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. व त्याच बरोबर तो पोलिस व लष्कर भरतीची तयारी सुद्धा करत होता. याच दरम्यान अंकितने गणेश आणि किरणला झटपट पैसे कमावण्यासाठी दुचाकी चोरी करण्याची आयडिया दिली.  दोघांनी या लालसेला भुलून चोरी करण्यास सहमती दर्शवली.

हे ही वाचा : 

दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच, मग तो मृत्यू अपघाती असल्याचा दावा कुणाचा?

शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी

‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर

लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल

तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या तीन चोरटयांनी तब्बल ९ बाईक चोरल्या, त्यापैकी पहिली बाईक ही अंकित पूर्वी ज्या हॉटेल मध्ये कामाला होता त्याच मालकाची ॲक्टिव्हा चोरली नंतर अंकित ने त्याच्याच घाटकोपर मधील मित्राची बुलेट बाईकची चोरी केली.  घाटकोपर पोलिस स्थानकाचे पोलिस अधीक्षक आनंद नेर्लेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तापस कार्य करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यावर हे आरोपी स्पष्ट झाले. त्यांनतर या तिघांना अटक करून चोरीकरण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाड्या सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामध्ये ६ ॲक्टिवा तर ३ बुलेट गाड्यांचा समावेश आहे. तसेच हे आरोपी गाडीचे कागदपत्र नंतर आणून देतो सांगत. बाईक २०-२५ हजार रुपयांना विकत होते. मात्र या झटपट मिळणाऱ्या पैशातून गणेशचे पोलिस सेवेत दाखल व्हायच्या स्वप्नांचा कायमचा चुराडा झाला आहे .

 

 

Exit mobile version