27 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामा'हा' उद्योगपती करतो दिवसाला २७ कोटी दान

‘हा’ उद्योगपती करतो दिवसाला २७ कोटी दान

Google News Follow

Related

भारतात दानशूर उद्योगपतींची संख्या कमी नाही. पण सर्वाधिक दान करणारा भारतीय उद्योगपती कोण असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा या उद्योगपतीचे नाव सर्वात अग्रणी असते.

माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ९७१३ कोटी रुपये म्हणजेच दररोज २७ कोटी रुपये दान केले. या दानासह त्यांनी सेवाभावी कार्य करणाऱ्या भारतीयांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवलेले आहे. प्रेमजींनी महामारीग्रस्त वर्षात त्यांच्या देणग्या जवळपास एक चतुर्थांशने वाढवल्या. त्यांच्या पाठोपाठ एचसीएलचे शिव नाडर होते, ज्यांनी धर्मादाय कामांसाठी १२६३ कोटी रुपयांची देणगी दिली. ह्युरन इंडिया EdelGive Hurun India Philanthropy List 2020 ने भारतातील सर्वाधिक दानशूर व्यक्तींची यादी प्रसारित केली आहे. त्यात अझीम प्रेमजी हे मानवतावादी कार्य करणाऱ्यांसाठी आदर्श असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोना काळात एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. परंतु दुसरीकडे भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत कित्येक पटीने वाढ होत होती. या संपत्तीचा वापर कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कोरोनाच्या वाईट काळात आपल्या संपत्तीचा वापर कशा प्रकारे समाजासाठी केला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे आहेत. २०२०-२१ या वर्षात अझीम प्रेमजी यांनी दररोज २७ कोटी रुपये दान केल्याचं समोर आलं आहे. मानवतावादी कार्यात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत त्यांनी आपलं सर्वोच्च स्थान कायम ठेवलं आहे.

अझीम प्रेमजी यांनी दहा राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाच्या कार्यात आपलं योगदान दिलं आहे. भारतात कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे १ एप्रिल रोजी अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविराधातील लढाईसाठी ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले होते. त्यानंतर या रक्कमेत त्यांनी वाढ करुन ती  २१२५ कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक CSR फंडाच्या आणि त्यांच्या इतर मानवतावादी कार्याच्या व्यतिरिक्त होती.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी ५७७ कोटी रुपयांच्या योगदानासह यादीत तिसरे आणि कुमार मंगलम बिर्ला ३७७ कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहेत. देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे आपत्ती निवारणासाठी १३० कोटी देणगीसह देणगीदारांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

हे ही वाचा:

टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार

अवघ्या ४६व्या वर्षी पुनीत राजकुमारचे निधन

…आणि तनिष्कला दिवाळीची ‘कोरडी’ जाहिरात बदलावी लागली

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून १८३ कोटी रुपयांच्या देणगीसह ते यादीत पाचव्या स्थानावर आहेत. शीर्ष दहा देणगीदारांमध्ये हिंदुजा कुटुंब, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल आणि बर्मन कुटुंबाचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा