शिल्पा शेट्टीला न्यायालयाची चपराक

शिल्पा शेट्टीला न्यायालयाची चपराक

राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं शिल्पा सांगत आहे. यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात दिवाणी खटला दाखल केला होता. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या.

या प्रकरणी आज (३० जुलै) सुनावणी पार पडली. यात शिल्पाच्या सगळ्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या. शिल्पा शेट्टीला सध्या कोणताही अंतरिम दिलासा देता येणार नाही, असं हायकोर्टनं म्हटलं आहे.

शिल्पाने याचिकेत २९ जणांना प्रतिवादी केलं आहे. हे प्रतिवादी काही चॅनलचे प्रमुख आहेत. युट्यूब चॅनेलचे प्रमुख आहेत. यात तिने म्हटले होते की, काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलला आपल्या बाबत विसंगत माहिती देण्यास बंदी करावी, अशी मागणी शिल्पा हिने केली होती.

मात्र, पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे. आम्ही त्यांनी काय छापावं आणि काय नाही, हे सांगू शकत नाही. मात्र, पत्रकारिता जबाबदारीने व्हायला हवी, असे कोर्टाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ करा

कृणाल पांड्यापाठोपाठ ‘या’ दोन खेळाडूंनाही कोरोना

फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?

शिल्पा शेट्टी हीचा राज कुंद्रा केसशी कहीही संबंध नाही. मात्र, यानंतरही शिल्पाचा संबंध त्या केसशी जोडला जातोय. तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आहे. हे चुकीचं आहे. हे थांबवायला हवं. त्यासाठी आम्ही कोर्टात आलो आहोत. आम्ही त्यांच्यावर बंदी घाला असं म्हणत नाही, आम्ही केवळ आमच्याबाबत बदनामी करणारा मजकूर प्रसारित करण्यास मनाई करा, अस म्हणतोय. याप्रकरणी फेसबुक, ट्विट, इन्स्टाग्राम, युट्यूब या कंपन्यांना सूचना द्याव्यात. आमच्या विरोधात बदनामीकारक मजकूर, बातम्या प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाच्यावतीने करण्यात आली होती.

Exit mobile version