हॅशटॅग अरेस्ट राणा ट्विटरवर होतोय ट्रेंड

हॅशटॅग अरेस्ट राणा ट्विटरवर होतोय ट्रेंड

पत्रकार राणा अय्यूब यांना अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ट्विटरवर लोक त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. त्यामुळे अरेस्ट राणा हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड आहे. तसेच लोक राणा अय्युबवरही कमेंट करत आहेत.

अय्यूब राणा यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. समाजकल्याणाच्या नावाखाली जमा केलेले कोट्यवधी रुपये स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वापरल्याचा ईडीचा आरोप आहे. या प्रकरणी राणा अय्यूब यांची तब्बल १.७७ कोटी इतकी रक्कम गोठवण्यात आली आहे.

राणा अय्यूबसारख्या जिहादींना चुकीची माहिती पसरवण्याप्रकरणी आणि बनावट व्हिडीओ पसरवण्याप्रकरणी तात्काळ अटक करून तुरुंगात पाठवावे, असे ट्विट लाली गांगुली यांनी ट्विट केले आहे.

दीपक गर्ग यांनी ट्विट केले की, ज्या लोकांकडून राणा अय्युब यांनी देणगी घेतली ते बहुतेक परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांकडून अशा प्रकारे देणगी घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे दीपक गर्ग यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी

संजय राऊत पुन्हा सोमय्यांवर घसरले

‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा

सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विकास सांकृत्यायन या व्यक्तीने राणा अय्यूब यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. राणा अय्यूब यांनी मदतनिधी उभारण्यासाठी वेगवेगळ्या नावाने अभियान चालवले आणि त्यातून अवैधरित्या देणग्या गोळा केल्या. त्यानंतर ही रक्कम स्वत:साठी वापरली. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली होती. त्याआधारे त्यांच्यावर गेल्या सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने तपास केला असता अनेक बाबी पुढे आल्या होत्या. त्याआधारे राणा अय्यूब यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version