भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे हरयाणाचे प्रमुख नफेसिंह राठी यांची अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी गोळी झाडून हत्या केली. बहादूरगढ येथे झालेल्या या हल्ल्यात अन्य एक पक्ष कार्यकर्ताही मारला गेला. राष्ट्रीय लोकदलाचे नेते अभय चौटाला यांनीही पक्षकार्यकर्त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
ह्युंदाई आय १०मधून आलेल्या मारेकऱ्यांनी राठी यांच्या एसयूव्ही गाडीवर गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात अनेक सुरक्षारक्षकांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. सीआयए आणि एसटीएफ पथकाने तपासाला सुरुवात केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास झज्जरचे पोलिस अधीक्षक अर्पित जैन यांनी व्यक्त केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मराठा आंदोलन: मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद!
आधी ग्रामस्थांकडून चपलेने मार, नंतर तृणमूलचा नेता पोलिसांच्या ताब्यात!
ज्ञानवापीतील ‘व्यास तळघरा’मध्ये पूजा सुरूचं राहणार!
“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”
चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यातील दोघांना आम्ही वाचवू शकलो नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले. नफेसिंह राठी यांच्यावर अनेकदा गोळ्या झाडण्यात आल्याचे डॉ. मनीष शर्मा यांनी सांगितले. तर, अन्य दोन जखमींच्या खांदा, छाती आणि मांड्यांना गोळ्या लागल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राठी यांच्या जीवाला धोका असल्याचे वारंवार सांगूनही राज्य सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप अभय चौटाला यांनी केला आहे. या घटनेनंतर चौटाला यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा यांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका केली. काँग्रेसच्या माजी खासदार कुमारी सेल्जा यांनीही राठी यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करून भाजपने राज्यात जंगल राज निर्माण केले असल्याचा आरोप केला.