27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाहरयाणाचे माजी मुख्यमंत्री आता झाले १०वी, १२वी पास!

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आता झाले १०वी, १२वी पास!

Google News Follow

Related

शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते असे म्हणतात. देशातील एका माजी मुख्यमंत्र्याने वयाचा बाऊ न करता १०वी, १२ वी परीक्षा उत्तीर्ण केली.

हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून एकेकाळी काम केलेल्या चौताला यांचे दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. पण वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी या दोन्ही इयत्ता पास करत नवा विक्रमच केला. एवढेच नव्हे तर या इयत्तांत पास होताना त्यांनी चक्क प्रथम श्रेणीमध्ये गुण मिळविले.

हरयाणा राज्य सरकारने त्यांना या दोन्ही इयत्तामधील उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र चौताला यांना दिले. भारतीय लोकदल पक्षाचे नेते असलेले चौताला हे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४२८व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात उपस्थित होते. ते त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना निकालाची प्रत चौतालांकडे सोपविली.

२०१९मध्ये चौताला यांनी १०वीची परीक्षा दिली होती. पण त्यावेळी त्यांना इंग्रजीची परीक्षा देता आली नव्हती. त्यामुळे त्यांना १२वीची परीक्षाही देता आली नाही. शेवटी ऑगस्टमध्ये त्यांनी इंग्रजीची परीक्षा दिली आणि त्यात त्यांना ८८ टक्के गुण मिळाले.

हे ही वाचा:

महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार

होय, यासिन मलिक दहशतवादी कृत्यात सहभागी होता!

‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?

महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न

 

चौताला यांच्या या विक्रमाच्या आधारावर दसवी हा चित्रपटही आला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि निमरत कौर यांनी अभिनय केला आहे. तिहार तुरुंगात ओमप्रकाश चौताला हे भरती घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.

अभिषेक बच्चन आणि निमरत कौर यांनी चौताला यांचे या निकालाबद्दल अभिनंदन केले आहे. अभिषेक बच्चनने बधाई!!! दसवी असे लिहिले असून निमरतने अतिशय सुंदर, वय म्हणजे एक किंवा दोन अंकी संख्या या पलिकडे काहीही नसते, असे ट्विट केले आहे.

चौताला हे ८७ वर्षांचे असले तरी अजूनही राजकारणात वावरतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा