शेअर मार्केटचा घोटाळेबाज हर्षद मेहताच्या ‘या’ सहकाऱ्याला पकडले

शेअर मार्केटचा घोटाळेबाज हर्षद मेहताच्या ‘या’ सहकाऱ्याला पकडले

शेअर्स मार्केट घोट्याळ्यातील मुख्य आरोपी हर्षद मेहता याच्या एका सहकाऱ्याला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हर्षद मेहताने केलेल्या घोटाळ्याचा एकेकाळी प्रचंड गाजावाजा झाला होता.

सहकारी निरंजन शहा याला अंमली पदार्थ प्रकणातील गुन्ह्यात दिल्लीच्या एका खेड्यातून अटक करण्यात आली आहे. या खेड्यात शहा हा अटकेच्या भीतीने वेष बदलून राहात होता. अटक करण्यात आलेल्या शहा याच्यावर डीआरए, एनसीबी मुंबई नार्कोटिक्स विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. हि कारवाई दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटन केली आहे.

निरंजन चिमणलाल शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने १७ मार्च रोजी सोहेल युसूफ मेमन याला अडीच कोटी रुपये किमतीच्या एम.डी या अंमली पदार्थासह अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याने निरजंन याच्याकडून हा अंमली पदार्थ घेतल्याचे कबूल केले होते.

एटीएसने या गुन्ह्यात निरंजन शहा याचा शोध सुरू केला होता. मात्र निरंजन शहा हा मुंबई बाहेर पळून गेला असून राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि हैदराबाद येथे वेष बदलून लुप्त फिरत असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

शहा शोध सुरु असताना शहा हा दिल्लीतील एका खेड्यात असल्याची माहिती एटीएसच्या जुहू युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसचे पथक दिल्लीतील मुनेरक गाव येथे दाखल झाली. निरंजन शहा हा मुनेरक गाव येथे एक छोटेसे झोपड राहत होता व त्याने तो गरीब असल्याचे गावकऱ्यांना भासवले होते. दरम्यान एटीएसच्या पथकाने त्याचा मुनेरका गाव येथे शोध घेऊन त्याला अटक करून मंगळवारी मुंबईत आणण्यात आले आहे.

हे ही वाचा:

लाखोंची रोकड तर सापडली, पण बघून धक्काच बसला!

प्राणवायू प्रकल्पाच्या कामात एकाच कंत्राटदारात अडकला जीव

उद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी

खादी व ग्रामोद्योग लेहमध्ये फुलवणार हिरवळ

निरंजन शहा हा १९९० साली जाहल्या शेअर्स मार्केट घोट्याळ्यातील मुख्य आरोपी हर्षद मेहता याचा सहकारी असून त्याच्यावर देखील मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

Exit mobile version