अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती

अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून ते पाडावे लागणार असल्याचे मार्च महिन्यात स्पष्ट झाले होते. दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट झालं होतं. अखेर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे.

या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीमधील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. अखेर या रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील टि्वट सोमय्या यांनी केले आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचा भारताच्या सार्वभौमत्वावर विश्वास नाही’

हिंदू देवांना शिविगाळ करून मुस्लिम मित्रांची हिंदू मुलांना मारहाण

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल सिद्दारमय्या यांच्या मुलाविरोधात तक्रार

ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. यापूर्वी खेड जिल्हा न्यायालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक अनियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्ञ समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

Exit mobile version