मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेज दिसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश शहरातील दांडी आश्रमाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला फेकण्यात आले. त्यानंतर मुलगी मदत मागत रस्त्यावर फिरत होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या बडनगर रस्त्यावर ही पीडित मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत फिरत होती.
मुलीच्या अंगावर एक कापडाचा तुकडा होता, ज्याने तिच्या अंगाचा थोडा भाग झाकला गेला होता. पीडित मुलगी रस्त्यावरील एका घराच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे मदत मागते परंतु तो तिला हाकलून लावत आहे, सीसीटीव्ही कॅमेरात ही दृशे कैद झाली आहेत. मुलगी शेवटी रस्त्यावर फिरत एका आश्रमात पोहोचली. तिथल्या एका पुजाऱ्याला लैंगिक हिंसाचाराचा संशय आला, त्याने तिला टॉवेलने झाकून जिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत
मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
जखमी अवस्थेत गंभीर असल्याने मुलीला इंदूरला नेण्यात आले. तिला रक्ताची गरज असताना पोलीस कर्मचारी पुढे आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड
रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी
एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा
नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीडित मुलीला तिचे नाव आणि गावचा पत्ता विचारला पण ती सुसंगतपणे उत्तर देऊ शकली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे कठोर संरक्षण (POCSO) कायदा देखील लागू करण्यात आला आहे. उज्जैनचे पोलीस प्रमुख सचिन शर्मा यांनी सांगितले की, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरु आहे तसेच आरोपींना अटक करण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे.
वैद्यकीय तपासात मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आम्ही तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे.आम्ही लोकांना आवाहन करतो की, याप्रकरणी कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवा, असे शर्मा म्हणाले. हा गुन्हा कोणत्या ठिकाणी घडला या प्रश्नावर अधिकाऱ्याने सांगितले की, “याचा तपास सुरू आहे. लवकरच माहिती समोर येईल. ती मुलगी नेमकी कुठली आहे हे सांगू शकली नाही. पण तिच्या उच्चारावरून ती उत्तर प्रदेशातील प्रयागराजची असल्याचे वाटत आहे, ते पुढे म्हणाले.