हल्द्वानी हिंसाचार; समाजकंटकांना पेट्रोल बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान

अर्ध्या तासात बॉम्ब तयार ठेवून केला हल्ला

हल्द्वानी हिंसाचार; समाजकंटकांना पेट्रोल बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान

हिंसाचार उसळलेल्या उत्तराखंडमधील हिल्द्वानीमधील बनभूलपुरा भागात काही समाजकंटकांना पेट्रोल बॉम्ब बनवता येत होता. पोलिसांनी दगडफेकीसह अश्रूधूर सोडल्यानंतर समाजकंटकांनी अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब तयार केले आणि ते पोलिसांवर फेकण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी दगडफेकीला सुरुवात झाल्यानंतर अनेक समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्ब न पेटवताच पोलिसांवर फेकले.

गुरुवारी अवैध मदरसा आणि मशिद तोडल्यानंतर चारही बाजूंनी घेराव घालून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनीही दगडफेक करून सडेतोड उत्तर दिले आणि अश्रूधूराचे गोळे सोडण्यास सुरुवात केली. रात्र झाल्यानंतर समाजकंटकांनी कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणून जवळ उभ्या असणाऱ्या दुचाकीमधून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते घटनास्थळीच पेट्रोल बॉम्ब तयार करू लागले. यासाठी त्यांना केवळ अर्धा तास लागला.

हे ही वाचा:

  ईडीच्या कारवाईविरोधात वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव

लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणार

जाडेजा, केएल राहुल भारतीय संघात परतले

पोकरचा हरलेला डाव…

पाच मुले पेट्रोल बॉम्ब बनवत होती आणि गल्लीत पोलिसांच्या गाडीवर फेकत होती. या दरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीवर बॉम्ब पडला आणि गाडी पेटली. पोलिसांनी लगेचच गाडी सोडून पलायन केले. दुसरा पेट्रोल बॉम्ब पोलिसांच्या पीसीआर गाडीवर पडला आणि ती गाडीही पेटली. पळणाऱ्या जवानांवरही पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. मात्र पेट्रोल बॉम्ब पेटते नसल्याने ते बचावले. बनभूलपुरा पोलिस ठाण्यावरही काही समाजकंटकांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. या प्रकरणी पोलिसांनी पाच हजार समाजकंटकांवर खटला दाखल केला आहे. घटनास्थळ आणि परिसरातून पाच मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. प्रत्येक समाजकंटकावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधिकाऱ्याने दिला आहे.

Exit mobile version