मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदला ३१ वर्षांचा तुरुंगवास

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदला ३१ वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी, ८ एप्रिल रोजी दहशतवादी हाफिज सईदला ३१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने सईदला ३ लाख ४० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. टेरर फंडिंगशी संबंधित दोन खटल्यांच्या सुनावणीनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमेरिकेने सईदला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. विशेष म्हणजे तो पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत असून सार्वजनिक सभांना संबोधित करत आहे. २००८ मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार त्याला दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.

जमात-उद-दावाच्या प्रमुखाला दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, ही शिक्षा मुंबई हल्ल्यासाठी नाही. हे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. रिपोर्ट्सनुसार, हाफिज सईदला यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये ११ वर्षांची आणि नोव्हेंबर २०२० मध्ये १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबई हल्ल्यामागे त्याचा हात होता ज्यात १६६ सामान्य लोकांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

UNHRC मधून रशिया निलंबित

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

सईदच्या नेतृत्वाखालील संघटना जमात-उद-दावाचे संबंध लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहेत. भारतातही एनआयए कोर्टाने हाफिज सईदवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मसरत आलमवर विविध कलमांखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. हाफिज हा लष्कर आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यातील संबंधांमुळे भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. सईदचे नाव एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीतही समाविष्ट असून भारताने त्याच्या संघटनेवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली आहे.

Exit mobile version