मुंबईत मरीन लाइन्स येथे असलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि नंतर फाशी देण्यात आलेल्या याकुब मेमनच्या कबरीचा वाद उफाळून आला आहे. यासंदर्भात आधी या कबरीचे कोणतेही सौंदर्यीकरण करण्यात आले नसल्याचे सांगणाऱ्यांचे बिंग आता फुटले आहे. या कबरीला लायटिंग करण्यासाठी आणि संगमरवरी काम करण्यासाठी धमकी येत होती. पण तत्कालिन विश्वस्तांनी वक्फ बोर्डाकडे यासंदर्भात ऑगस्ट २०२०ला तक्रार केली होती मात्र वक्फ बोर्डाने त्याकडे लक्ष दिलेले नसल्याचे समोर येते आहे. त्यानंतर हे सौंदर्यीकरण झाले. त्यामुळे वक्फ बोर्डाची यात कोणती भूमिका आहे? हे जेव्हा घडले तेव्हा वक्फ बोर्ड ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते त्या अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक होते, त्यांना या गोष्टी ठाऊक होत्या का, याविषयी आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टाइम्स नाऊने याबाबत केलेल्या बातमीतून या गोष्टी समोर आल्या आहेत. कुख्यात दहशतवादी टायगर मेमन जो मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असून त्याचे नाव घेऊन याकुब मेमनच्या चुलत भावाने हे सौंदर्यीकरण करण्यासाठी दमदाटी केली होती. जिथे याकुब मेमनला दफन करण्यात आले, त्या बडा कब्रस्तानचे माजी विश्वस्त परवेश सरकार यांनी सांगितले की, याकुब मेमनच्या चुलत भावाने आम्हाला धमकावले होते. आम्ही जेव्हा त्याला विरोध केला तेव्हा त्या चुलत भावाने टायगर मेमन तुझ्याशी बोलू इच्छितो असे सांगत आमच्यावर दबाव आणला. पण मी काही फोनवर कोणतीही बातचीत केली नाही.
हे ही वाचा:
अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना
गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्या
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण
याच कब्रस्तानचे आणखी एक विश्वस्त जझील नवराने यांनीही या कबरीच्या सौंदर्यीकरणाला विरोध केला होता. पण या दोघांनीही विरोध केला म्हणून त्यांना हटविण्यात आले. त्याविरोधात त्यांनी वक्फ बोर्डाकडे तक्रार केली होती पण कोणतीही कारवाई झाली नाही किंवा त्यांना वक्फ बोर्डाने चौकशीसाठी बोलावलेही नाही.
परवेश कुमार यांनी म्हटले आहे की, आम्हाला याकुबच्या चुलत भावाने १७, १८, १९ क्रमांकाच्या कबरी हव्या आहेत असे सांगितले. या कबरी जनरल होत्या त्यात अन्य मृतदेहांचेही दफन केले जाणार होते. त्यामुळे आम्ही असे करता येणार नाही असे सांगितल्यार त्यांनी आम्हाला धमकावले.
जझील नवराने यांनी जुने फोटो दाखवून त्यावेळी असे कोणतेही संगमरवर किंवा लायटिंग केली गेली नसल्याचे दाखविले. ऑगस्ट २०२०ला आम्ही वक्फ बोर्डाकडे तक्रार केली होती, असेही सांगितले.
या कबरीवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि संगमरवराचे काम लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी ती लायटिंग काढून टाकली आहे. यासंदर्भात आता चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची चौकशी होईल, असे आश्वासन दिले आहे. एका दहशतवाद्याच्या कबरीला लायटिंग कशी काय करण्यात आली याचा तपास केला जाणार आहे.