गुटखा किंग जे. एम. जोशी यांच्या मदतीने दाऊदने पाकिस्तानातील कराची येथे गुटखा कंपनी काढली.
गोवा गुटख्याचे मालक जे एम जोशीं आणि कुख्यात डॉन दाऊद इम्ब्राहीमचा साथीदार यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
विशेष न्यायालयाने जोशी यांच्यासह जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवले आहे. दोघांनाही दहा दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि याशिवाय तिघांनाही पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हे ही वाचा:
तामिळनाडूमध्ये ३५६ कलम लागू करा! सोशल मीडियावर #Article 356 हा ट्रेंड
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च
काय आहे प्रकरण.
दाऊद इब्राहिमने जे.एम. जोशींच्या मदतीने पाकिस्तानातील कराची येथे गुटखा कंपनी उघडली होती. या प्रकरणांत न्यायालयाने जे.एम.जोशी यांच्या बरोबर आणखी तिघांना दोषी ठरवले आहे.माणिकचंद गुटखा कंपनीचा मालक रसिकलाल धारीवाल याच्यावरही दाऊदला मदत केल्याचा आरोप आहे. २०१७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, ते या प्रकरणातून मुक्त झाले.
रसिकलाल धारीवाल आणि जे एम जोशी सुरुवातीला एकत्र गुटख्याचा व्यवसाय करायचे, नंतर त्यांच्यात वाद झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर जे.एम.जोशी यांनी गोवा गुटखा नावाची कंपनी सुरू केली. सीबीआयच्या तपासानुसार जे. एम. जोशी यांनी दाऊद इब्राहिमच्या फायर गुटखा कंपनीला २.६४ लाख रुपयांच्या पाच मशीन्स दुबईमार्गाने पाकिस्तानला पाठवल्या होत्या. पाकिस्तानात दाऊदच्या कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यालाही जोशी आणि धारीवाल हे दोघेही उपस्थित होते.