26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाबंबल डेटिंग ऍपवर झाली ओळख, बॉयफ्रेन्डने चुना लावला!

बंबल डेटिंग ऍपवर झाली ओळख, बॉयफ्रेन्डने चुना लावला!

गुरुग्राममधील घटना

Google News Follow

Related

बंबल डेटिंग अॅपमार्फत झालेली ओळख गुरुग्राममधील एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे.तरुणीला भेटण्यासाठी आपल्या आईसोबत आल्याचा खोटा बनाव करत बंबल डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या बॉयफ्रेंडने तरुणीला एक लाखाचा चुना लावला आहे.आपली फसवणूक झाल्याचे समजताच पिडीतेकडून बॉयफ्रेंडविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आजच्या युगात फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे.आधार घोटाळे, केवायसी घोटाळे, ऑनलाइन जॉब स्कॅम घोटाळे भारतात वाढतच चालले आहेत. फसवणूक करणारे लोक सतत त्यांच्या पैशासाठी लोकांची फसवणूक आणि फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत.व्हाट्सअप आणि टेलिग्राम सारखे प्लॅटफॉर्म स्कॅमरसाठी जास्त उपयुक्त ठरले आहे.कारण यामार्फत स्कॅमरला पीडितांशी संपर्क साधने अधिक सोपे पडते तसेच डेटिंग अॅप्स हे देखील धोकादायक आहे.नुकतीच तशी एक घटना घडली.एका स्कॅमरने बंबल या डेटिंग अॅपचा वापर करत गुरुग्राममधील एका तरुणीचे एक लाख रुपये लुटण्यात यशस्वी झाला आहे.

पीडित तरुणी(३५) गुरुग्राममधील सेक्टर- ३९ मधील कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR)-IMTech मध्ये कार्यरत आहे.या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात तरुणीची ओळख डॉ.अयान कुमार जॉर्ज नामक व्यक्तीशी बंबल अॅपवर झाली.आरोपी डॉ.अयान कुमार जॉर्ज हा युनायटेड किंगडममध्ये राहणारा असून तो डॉक्टर असल्याचे ओळखीत सांगितले.त्यानंतर दोघांची चांगलीच गट्टी जमली आणि दोघांनी व्हॉट्सअॅपद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली.त्यानंतर दोघांचे संभाषण सुरूच राहिले, असे द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

हे ही वाचा:

आणि डॉक्टर शस्त्रक्रिया सोडून निघून गेले!

शाकीब, बांगलादेशबद्दल आदर आता कमी झाला!

मुंबईतील कोळीवाडा पर्यटनाचे केंद्र ठरावे यासाठी शासन कटिबद्ध

मुंबईतील कोळीवाडा पर्यटनाचे केंद्र ठरावे यासाठी शासन कटिबद्ध

मात्र, पीडितेची परिस्थिती एके दिवशी बिकट झाली.ती म्हणजे ओळख झालेल्या जॉर्जने २८ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅप कॉल केला व सांगितले की,तुला भेटण्यासाठी आपल्या आईसोबत दिल्ली विमानतळावर आलो आहे.काही वेळातच तिला एका महिलेचा दुसरा व्हॉट्सअॅप कॉल आला, त्या महिलेने कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. बनावट अधिकाऱ्याने पीडितेला सांगितले की जॉर्जकडे १ लाख यूके पौंड सापडले आहेत, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहेत. त्यानंतर अधिकाऱ्याने पीडितेला ऑनलाइन खात्यात ६८,५०० रुपये भरण्याची मागणी केली.त्यानंतर पीडितेने स्कॅमरच्या बँक खात्यात ६८,५०० रुपये ट्रान्सफर केले.

त्यानंतर आणखी एका महिलेने पीडितेला फोन करून पाउंडची रक्कम खूप जास्त असल्याचे सांगून अतिरिक्त ३ लाख रुपयांची मागणी केली.पीडितेने संकोच व्यक्त केला तेव्हा महिला कॉलरने फोन डॉ. जॉर्ज यांच्याकडे दिला, जॉर्जने पीडितेला पैसे पाठवण्याची विनंती केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने स्पष्ट केले की ती फक्त १ लाख रुपये पाठवू शकते कारण तिने आधीच ६८,५०० रुपये ट्रान्सफर केले आहेत.त्यानंतर दबावाखाली येऊन तिने कस्टम अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या महिला कॉलरच्या सूचनेनुसार आणखी ३०,००० रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले.अखेर पीडितेच्या लक्षात आले की तिची फसवणूक झाली आहे आणि तिने डेटिंग अॅप डिलीट केले. परंतु घोटाळेबाज तिला वेगळ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल करत राहिला.या प्रकरणात पीडितेला ९८,५००० रुपयांचे नुकसान झाले.त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४१९, ४२० आणि १२०B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा