गुरुग्राम मेदांता रुग्णालय: व्हेंटिलेटरवर असताना लैंगिक अत्याचाराचा एअर होस्टेसकडून आरोप

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप

गुरुग्राम मेदांता रुग्णालय: व्हेंटिलेटरवर असताना लैंगिक अत्याचाराचा एअर होस्टेसकडून आरोप

हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना एअर होस्टेसवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका ४६ वर्षीय एअर होस्टेसने केला आहे. शिवाय त्यावेळी खोलीत दोन परिचारिका उपस्थित होत्या परंतु त्यांनी ही घटना थांबवण्यासाठी काहीही केले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आरोप करणारी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

पश्चिम बंगालमधील एअर होस्टेस महिला एका वर्कशॉपसाठी म्हणून गुरूग्राममध्ये आली होती. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये ही महिला बुडाली होती. यानंतर बचावलेली महिला आजारी पडली म्हणून तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर, ६ एप्रिल रोजी, तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तिच्या पतीने तिला परिसरातील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवले, जिथे ही घटना घडली. ६ एप्रिल रोजी व्हेंटिलेटरवर असताना काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे बोलण्याच्या किंवा त्या माणसांच्या हालचालींना विरोध करण्याच्या स्थितीत नसल्याचे त्या महिलेने म्हटले. तसेच खोलीत दोन परिचारिका होत्या, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही, अशी तक्रार महिलेने केली आहे. १३ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, एअर होस्टेसने तिच्या पतीला घटनेबद्दल सांगितले आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी विनयभंग आणि भारतीय न्याय संहिताच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात मेदांता हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, ते पोलिसांच्या चौकशीमध्ये पूर्णपणे सहकार्य करत आहेत. तरीही, आतापर्यंत कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. “आम्हाला रुग्णाच्या तक्रारीची माहिती असून संबंधित अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. या टप्प्यावर, कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि संबंधित कालावधीतील रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजसह सर्व संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा : 

वन खात्याच्या जमिनीवर उभ्या केलेल्या ५० वर्षे जुन्या अनधिकृत मशीदीवर चालवला बुलडोझर

१३ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा बस्तरमध्ये खात्मा

अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीचं राडा, पोलिसांवर दगडफेक; नाशिकमध्ये मध्यरात्री काय घडलं?

अमेरिकेकडून मिळालेल्या दणक्यांनंतर चीनसाठी भारत जवळचा; ८५,००० हून अधिक व्हिसा जारी

पोलिस उपायुक्त (पूर्व) गौरव म्हणाले की, आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता एसीपी यशवंत यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज गोळा करण्यात आले असून कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

पाटीलांचे विधान सांगतेय झिंग उतरली आहे ... | Dinesh Kanji | Vishal Patil | Congress | BJP |

Exit mobile version