नवी मुंबईच्या सानपाडा डी-मार्ट परिसरात कचरा ठेकेदारावर गोळीबार!

६ ते ७ राउंड फायर, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु 

नवी मुंबईच्या सानपाडा डी-मार्ट परिसरात कचरा ठेकेदारावर गोळीबार!

नवी मुंबईच्या सानपाडा डी-मार्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. अज्ञातांकडून ६ ते ७ राउंड फायर करण्यात आले आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला. ६ ते ७ राउंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. राजाराम ठोके या व्यक्तीवर हा गोळीबार करण्यात आला. राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केट मधील कचरा कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदारी वरून फायरिंग झाली आहे. या गोळीबारात राजाराम ठोके हे जखमी झाले असून उपचाराकरिता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

रेल्वे रुळावर पडला होता लोखंडी दरवाजा; रेल्वे उलटवण्याचा होता कट!

सपा खासदार बर्क यांना दणका; एफआयआर रद्द होणार नाही

फिलिपाईन्स, व्हिएतनामनंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ‘ब्राह्मोस’!

मुंब्र्यात मराठी माणसाला माफी मागायला लावली! मनसेची मराठी माणसाला हाक

भर दिवसा नवी मुंबईच्या सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. पोलीस संबंधित घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.  हा गोळीबार आणखी अन्य कोणत्या कारणाने करण्यात आला का?, याचाही पोलीस तपास करत आहेत.

Exit mobile version