गुजरात एटीएस, तटरक्षक दलाची दमदार कामगिरी

गुजरात एटीएस, तटरक्षक दलाची दमदार कामगिरी

गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाने एक पाकिस्तानी नौका तिच्यावरील हेरॉईन आणि आठ पाकिस्तानी नागरीकांसह जप्त केली आहे. १४-१५ एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना गुजरातच्या समुद्रात घडली.

गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी नौका पकडण्यात आली. या नौकेवर ८ पाकिस्तानी नागरिक आणि सुमारे ३० किलो हेरॉईन देखील आढळले. गुजरातच्या जाखाऊ येथील भारतीय तटरक्षक दलाने या कारवाईत सहभाग घेतला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘नुह’ असे असल्याचे देखील समजले आहे.

हे ही वाचा:

आज डॉक्टरांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

१४-१५ एप्रिलच्या मध्यरात्रीत ही कारवाई करण्यात आली होती. या नौकेवरून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ₹३०० कोटी असल्याचे सांगितले गेले आहे. प्राथमिक तपासात, हा मुद्देमाल गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचवण्यात येणार होता. ही बोट आणि त्यावरील ८ पाकिस्तानी नागरिकांना जाखाऊ येथे आणण्यात आले आहे. आता या घटनेचा अधिक खोलवर तपास केला जाईल. हा तपास देखील संयुक्त पद्धतीतून होणार आहे.

या बाबत एएनआय वृत्तसंस्थेने सविस्तर ट्वीट करून माहिती दिली आहे.

Exit mobile version