गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

तत्काळ पोलिसांना शरण जाण्याचे कोर्टाचे निर्देश

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच त्यांना तत्काळ पोलिसांना शरण जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. तिस्ता यांच्यावर गुजरात दंगलीशी संबंधीत खटल्यांमध्ये निष्पाप लोकांना अडकवण्यासाठी पुरावे तयार केल्याचा आरोप आहे. तिस्ता यांना सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२२ मध्ये अंतरिम जामीन मंजूर केला होता.

गुजरात पोलिसांनी २५ जून २०२२ रोजी अहमदाबाद डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रँचने (डीसीबी) दाखल केलेल्या एफआयआरनुसार तिस्ता सेटलवाड यांना अटक केली होती. त्यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलीच्या संदर्भात निष्पाप लोकांना गोवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सेटलवाड यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर २ जुलै २०२२ रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

अहमदाबाद क्राईम ब्रांचने गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट आणि डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संजीव भट्ट आधीच तुरुंगात आहेत, तर तिस्ता आणि श्रीकुमार यांना आता अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंच्या मनपाविरोधातील मोर्चाचे शिंदेंविरोधातील सभेत रूपांतर

ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री म्हणतो, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा!

समृद्धी महामार्ग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द; ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम

गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर २७ फेब्रुवारी २०२२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस- ६ डब्याला आग लावून ५९ भाविकांना ठार करण्यात आले होते. हे सर्व कारसेवक होते. ते अयोध्येहून परतत होते. गोध्रा येथील घटनेच्या प्रतिक्रियेत संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये कथितपणे १ हजार ४४ लोक मारले गेले होते.

Exit mobile version