पुण्यानंतर आता अहमदाबादमध्ये घुसखोर बांगलादेशी सापडले!

अहमदाबाद गुन्हे शाखेची कारवाई

पुण्यानंतर आता अहमदाबादमध्ये घुसखोर बांगलादेशी सापडले!

भारतात अवैद्यरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे. अशा बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन, चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले जात आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेने अशीच कारवाई करत अहमदाबादमधून ५० जणांना अटक केली आहे, जे सर्व बांगलादेशी नागरिक आहेत.

अहमदाबाद डीसीपी गुन्हे शाखेचे अजित राजियन यांनी सांगितले की, क्राइम ब्रँचने अहमदाबादमध्ये ५० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व बेकायदेशीरपणे अहमदाबादमध्ये राहत होते. तसेच २०० हून अधिक लोकांची चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : 

हरयाणा विधानसभा अध्यक्षपदी हरविंदर कल्याण यांची निवड होणार

कॅनडात खलिस्तानी ‘गुंडांची’ दहशत

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!

झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

दरम्यान, पुणे पोलिसांनी देखील २१ ऑक्टोबर रोजी कारवाई करत तब्बल २१ बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेतले होते. हे सर्व बांगलादेशमधून बेकादेशीररित्या भारतात शिरकाव करून पुणे जिल्हयातील कारेगावमध्ये वास्तव्यास होते. गुप्त माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत २१ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.

यामध्ये १५ पुरुष, ४ महिला व २ तृतीयपंथींचा समावेश होता. विशेष म्हणजे, यांच्याकडून भारतीय बनावट मतदान कार्ड, भारतीय आधार कार्ड, पेन कार्ड आढळून आले होते. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version