35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामा१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत

१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत

Google News Follow

Related

गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत १९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत.

गुजरात एटीएसने युसुफ भटाका, शोएब बाबा, सैय्यद कुरेशी आणि अबू बकर या चौघांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर हे सर्व आरोपी परदेशात पळून गेले होते. त्यानंतर हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले आणि या संदर्भात गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

एनआयएने ९ मे रोजीच्या पहाटे मुंबई आणि उपनगरांमध्ये अशा एकूण २७ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर छोटा शकीलचे नातेवाईक आरीफ शेख आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात एनआयएला ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्यांना एनआयएने १३ मेच्या पहाटे अटक करुन कोर्टात हजर केले होते.

हे ही वाचा:

माथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा

वुमन्स टी-२० चॅलेंजसाठी तीन संघ या दिवसापासून मैदानात उतरणार

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, इकबाल मिर्ची, जावेद चिकना आणि इतर लोकांसोबत दाऊदने आपले हातपाय पसरले होते. भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती एनआयएने दिली असून त्या पार्श्वभूमिवरच कारवाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा