१२ किलो वजनी व्हेल माशाची उल्टी जप्त!

दोघांना अटक

१२ किलो वजनी व्हेल माशाची उल्टी जप्त!

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा येथे पोलिसांनी करोडो रुपयांच्या एम्बरग्रीसच्या (व्हेल उल्टी) तस्करीचा पर्दाफाश केला आहे. महुवा पोलिसांनी एका कारखान्यावर छापा टाकून १२ किलो वजनाची व्हेल माशाची उल्टी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हेल माशाच्या उल्टीची किंमत तब्बल १२ ते १५ कोटीच्या घरात असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जयदीप शियाळ आणि रामजी शियाळ अशी त्यांची नावे आहेत. महुवाचे एएसपी अंशुल जैन यांनी सांगितले की, अटकेतील जयदीप शियाळ याला पिंगळेश्वर महादेवजवळील समुद्रकिनारी दीड वर्षांपूर्वी ही व्हेल माशाची उल्टी सापडली होती. त्याने ते विकण्याचा खूप प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. या तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का?, याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, चामुंडा डाई कारखान्यात व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे छापा टाकून १२ किलो वजनी व्हेल माशाची उल्टी जप्त केली.  दरम्यान, व्हेल माशाच्या उल्टीला ‘समुद्राचे सोने’ असेही म्हटले जाते. हे दुर्मिळ आणि अतिशय मौल्यवान आहे. परफ्यूममध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

हे ही वाचा : 

शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

“बांगलादेशातील हिंदूंना मृत्यूला सामोरं जावं लागतंय”

जामा मशिद परिसरात शुक्रवारच्या नमाजापूर्वी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी तैनात

शोक आणि शॉक तेराव्यानंतर तरी संपणार काय?

पावशेर, शेर आणि शेरनी ! Mahesh Vichare | Sanjay Raut | Priyanka Gandhi Vadra

 

Exit mobile version