पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

पंजाबच्या पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर आज सकाळी हल्ला झाला. धिरपूल येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड फेकल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या घटनेचा तपास सुरू असून दुचाकीस्वारांचा शोध घेण्यात येत आहे.

आर्मी कॅम्पच्या परिसरातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकून हल्ला केला. त्यानंतर या दोघांनीही दुचाकीवरून पळ काढला. स्फोटाचा आवाज ऐकताच लष्कराचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी पठाणकोटमधील सर्व पोलीस चौक्यांना अलर्ट जारी केला असून पठाणकोटमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकत हा हल्ला केला आहे. त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरु आहे. या हल्ल्यामुळे पठाणकोटमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

“प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे की, आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. पुढील तपास सुरु असून गेटसमोरून एक दुचाकी गेली, त्याच वेळी हा हल्ला झाला. याबाबत अधिक तपास सुरु आहे. आम्हाला चांगला फोटो मिळण्याची आशा आहे,” असे पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

लेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

दक्षिणेत पुराचे थैमान सुरूच

पठाणकोट हे ठिकाण भारताच्या लष्कराच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वायुसेनेचे कॅम्प, लष्कराचा दारूगोळ्याचा डेपो आणि लष्कराच्या दोन ब्रिगेड आहेत. २०१६ मध्ये पठाणकोटमधील वायुसेनेच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर लष्कराचे आठ जवान शहीद झाले होते.

Exit mobile version