जम्मू-काश्मीरमध्ये दारूच्या दुकानावरील ग्रेनेड हल्ल्यात एक ठार

जम्मू-काश्मीरमध्ये दारूच्या दुकानावरील ग्रेनेड हल्ल्यात एक ठार

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. बारामुल्ला जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका दारूच्या दुकानाला लक्ष्य केले. या दुकानावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

कोर्ट रोडवर असलेल्या एका दारूच्या दुकानात मंगळवार, १८ मे रोजी रात्री साडेआठ वाजता दोन जण दुचाकीवरून आले. त्यातील एकाने बुरखा घातला होता. बुरखा परिधान केलेल्या दहशतवाद्याने दुकानाच्या खिडकीतून ग्रेनेड बॉम्ब फेकला आणि दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.

ग्रेनेडच्या स्फोटानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र, दरम्यान रणजीत सिंग यांचा मृत्यू झाला. तर जखमी गोवर्धन सिंग, गोविंद सिंग आणि रवी कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे चौघेही दुकानात काम करत होते.

हे ही वाचा:

पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही

मोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता

मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा

पंतप्रधान मोदींच्या कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा

या घटनेनंतर लगेचच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहशतवाद्यांच्या शोधात ऑपरेशन सुरू केले आहे. सध्या या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लश्कर-ए-तैयबाशी संलग्न दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फोर्सने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Exit mobile version