जम्मू- काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात बुधवार, ४ डिसेंबर रोजी पहाटे दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर ग्रेनेड फेकल्याचे वृत्त समोर आले आहे. दहशतवाद्यांनी फेकलेल्या दोन ग्रेनेड पैकी एका ग्रेनेडचा स्फोट झाला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ‘पीटीआय’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात लष्कराच्या छावणीच्या मागे असलेल्या लष्कराच्या चौकीवर बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी दोन ग्रेनेड फेकले. त्यापैकी एकाचा स्फोट झाला. यानंतर शोध मोहिमेदरम्यान एक ग्रेनेड निकामी करण्यात आला. तर स्फोट झालेल्या ग्रेनेडचा सेफ्टी पिन लष्कराच्या छावणीच्या भिंतीजवळ सापडला. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितानी झालेली नाही.
STORY | Grenade attack by terrorists on Army post in J-K's Poonch; no casualties
READ: https://t.co/zZpWmWy5y6 pic.twitter.com/AzAk7gV8Zn
— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2024
दरम्यान, श्रीनगरच्या दाचीगाम जंगलात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी हरवन, श्रीनगर येथे संयुक्त ऑपरेशन सुरू केले होते. शोध सुरू असताना दहशतवाद्यांशी प्राथमिक संपर्क प्रस्थापित झाला. यानंतर २ डिसेंबर रोजी चकमक सुरू झाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले.
हे ही वाचा:
हैद्राबादहून मुंबईत अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या आवळल्या मुसक्या
सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!
देवेंद्र फडणवीस झाले गटनेते; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार
यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी बारामुल्ला पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजेर भागात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला. बारामुल्ला पोलीस, बडगाम पोलीस आणि ६२ आरआर यांनी पोलीस स्टेशन कुंझरच्या अखत्यारित असलेल्या माळवा गावाला लागून असलेल्या जंगलात संयुक्त कारवाई सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान, पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आणि लपण्याचे ठिकाण देखील नष्ट केले.