पोलीस दलाची मोठी कामगिरी; गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर ३६ लाखांचे बक्षीस होते

पोलीस दलाची मोठी कामगिरी; गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवार, १९ मार्च रोजी पहाटे चकमक सुरू झाली. या चकमकीत पोलीस दलाला मोठे यश मिळाले असून या कारवाईत चार नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा मोठा डाव या नक्षलींनी आखला होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हा डाव उधळून लावला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर ३६ लाखांचे बक्षीस होते.

लोकसभा निवडणुकी दरम्यान मोठा घातपात घडवण्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात एक मोठा नक्षलवादी गट लपल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष सी-६० कमांडोंनी जंगल परिसरात कारवाई सुरू केली होती. कमांडो जंगलात येण्याची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. कमांडोकडूनही त्यांनाजोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. सुमारे दोन तास ही चकमक सुरू होती.

पोलिसांचे सी- ६० कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये पहाटेच्या सुमारास दीड ते दोन तास चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. या चकमकीत डीव्हीसी सदस्य वर्गीश, डीव्हीसी मंगतू, प्लाटून सदस्य कुरसम राजू आणि प्लाटून सदस्य व्यकंटेश यांचा खात्मा झाला. तसेच यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून एके-४७ रायफल आणि इतर काही शस्त्रेही जप्त केली आहेत.

हे ही वाचा:

जागावाटप मुद्द्यावरून मविआचा वंचितला अल्टिमेटम

मनसे होणार भाजपात सामील, राज ठाकरे दिल्लीला रवाना!

“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”

“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”

या कारवाईनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) यातिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात आली आहे. पोलीस मदत केंद्र रेपनपल्लीच्या ५ किमी अंतरावर कोलामार्का जंगलामध्ये नक्षलींचा शोध सुरु आहे. हे सर्व नक्षलवादी तेलंगणा सीमा ओलांडून गडचिरोलीत प्रवेश करत होते.

Exit mobile version