27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाकेंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी

केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी

दहशतवाद पसरवण्यासाठी वापर

Google News Follow

Related

केंद्र सरकारने पाकिस्तानी ऍपच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी घातली आहे. दहशतवादी या मोबाईल मेसेंजर ऍप्सचा वापर करून संदेश पसरवण्यासाठी आणि पाकिस्तानकडून संदेश प्राप्त केल्याचे आढळल्यानंतर सरकारने ही कारवाई केली आहे. या ऍपचा वापर जम्मू-कश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणावर आतंक पसरवण्यासाठी असे सांगण्यात येत आहे.

केंद्राने बंदी घातलेल्या एप्समध्ये क्रीपवाइजर, एनिग्मा, सेफस्विस, विक्रम, ब्रायर, बीचॅट, मीडियाफायर, नॅंडबॉक्स, कोनियन, आयएमओ, एलिमेंट, सेकंड लाइन, जंगी आणि थ्रीमा यांचा समावेश आहे. यातील काही एप्स गुगल प्लेस्टोअरवरही उपलब्ध आहेत.

दहशतवादी आपसात संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या माध्यमांवर संस्था लक्ष ठेऊन असतात . या संभाषणाचा मागावा घेत असतांना गुप्तचर संस्थांना या एपबद्दल माहिती मिळाली. या ऍपमध्ये असलेल्या फीचर्समुळे तपस संस्थांना या युझर्सपर्यंत पोहचणे कठीण जात होते. कारण त्याचे भारतात कोणतेही कार्यालय नव्हते. यापैकी एक ऍप आयटी कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत ब्लॉक करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कुस्तीगीरांचे आंदोलन म्हणजे हुडा आणि बजरंग पुनिया यांचा कट

इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार

जन्मदिनीच झाला पुनर्जन्म!! भिवंडी दुर्घटनेत २० तासांनंतरही तो राहिला जिवंत

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या इतर गुप्तचर संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात आणि भारतीय कायद्यांचे पालन न करणाऱ्या अशा ऍप्सची यादी तयार करण्यात आली. ही यादी तयार झाल्यानंतर या मोबाइल ऍप्सवर बंदी घालण्यासाठी संबंधित मंत्रालयाला विनंती करण्यात आली. त्यानंतर ही बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा