24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामादहीहंडी आयोजकांची मस्ती गोविंदा संदेश दळवीला नडली....

दहीहंडी आयोजकांची मस्ती गोविंदा संदेश दळवीला नडली….

आयोजकांच्या चुकीच्या कारभारामुळे गोविंदचा जीव गेला.

Google News Follow

Related

मुंबईत शुक्रवारी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक मंडळातील गोविंदानी मानवी मनोरे रचून, दहीहंडीसाठी मागील दोन वर्षाची कसर भरून काढली. विलेपार्ले येथे दहीहंडी फोडत असताना मानवी मनोऱ्यातून निसटून सहाव्या थरावरून खाली पडून जखमी झालेला संदेश दळवी यांचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी आयोजक रियाज मस्तान शेख यांना अटक केली असून, न्यायालयाने जामिनावर त्यांची सुटका केली.

विलेपार्ले बामणवाडा परिसरात शिवशंभो गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी आले होते. या पथकातील गोविंदाने सहा थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दहीहंडी फोडत असताना मानवी मनोरा कोसळला तरी संदेश दळवी दहीहंडीला लटकून राहिले, सहाव्या थरावरून उडी मारली असता, खाली जमिनीवर आपटल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. सोबतच विनायक रामवाडे ही जखमी झाले. सुरुवातीला या दोघांना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलीस घटनास्थळी पोहोचले. आयोजकांनी दहीहंडी कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा उपाययोजना न केल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

कुर्ला येथे त्याच्या राहत्या घरी स्थानिक शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दहा लाखांचा चेक त्यांच्या कुटुंबियांना दिला. २४ तासांच्या आतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली १० लाख रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली. या कुटुंबाचे सरकारतर्फे सांत्वन ही त्यांनी केले. तसेच या घरातील मोठा मुलगा योगेश याला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्नही करणार असून लवकरच मुख्यमंत्र्यांची या कुटुंबियांना भेट घडवून दिली जाणार आहे. तसेच या प्रकरणा संदर्भात विधानसभेत शिवसेना सदस्य अजय चौधरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा