ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण

ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण

तेलंगणातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सरकारी शाळेतील गणित या विषयाचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सांगत असे. लीगल राइट्स प्रोटेक्शन फोरमने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

मेळवार जिल्ह्यातील विरकराबाद येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमधील रत्नम नावाचा एक गणिताचा शिक्षक विद्यार्थ्यांना अमेरिकेतून पैसे आणि इतर भेटवस्तू आणून देतो असे आमिष दाखवून ख्रिश्चन बनण्याचे सांगत असे.

यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी या शिक्षकावर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. लहान चुका केल्यास हा शिक्षक दलित विद्यार्थ्यांना पायाला हात लावून त्यांना माफी मागायला सांगत. यासोबतच तो जातीच्या आधारे भेदभाव करून दलित विद्यार्थ्यांना मारहाण करत असे. तसेच मुलांचा विविध प्रकारे अपमान करायचा, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू

मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

सोन्याची लंका कुणी लुटली?

एसटीच्या “लेखा” विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गिळून टाकली..!

शिक्षक वर्गाच्या भिंतीवरून सरस्वतीचे चित्र काढून टाकण्यासाठी दबाव आणत असे आणि तसे न केल्यास अपशब्द वापरत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र लहान मुलांशी संबंधित अनेक कलमांतर्गत तक्रार न नोंदवल्याने स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) हस्तक्षेप करण्याची मागणीही केली जात आहे.

Exit mobile version