देशातील १२ हजार सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ल्याची भीती

नोव्हेंबरमध्ये चिनी हॅकर्सनी एम्सच्या सर्व्हरवर रॅन्समवेअरने केला होता हल्ला

देशातील १२ हजार सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ल्याची भीती

देशभरातील १२,०० सरकारी वेबसाइटवर सीमेपलीकडून सायबर हल्ले होऊ शकतात. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने ही भीती व्यक्त केली आहे. केंद्राने १४ एप्रिल रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत इशारा दिला आहे. इंडोनेशियातील एक हॅकर गट हे अंमलात आणण्याचा कट रचत असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिनी हॅकर्सनी दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या सर्व्हरवर रॅन्समवेअरने हल्ला केला होता. त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पाच सर्व्हरमध्ये हॅकर्सने घुसखोरी केल्याचे सांगितले होते. या सर्व पाच सर्व्हरवरील डेटा यशस्वीरित्या पुन्हा मिळवण्यात आला होता.

गृह मंत्रालयाच्या १४ सी विभागाला हा इंडोनेशियन हॅकर गट आपला हेतू पूर्ण करण्याचा विचार करत आहे. .हा संभाव्य हल्ला सरकारी वेबसाइटवर मग ती राज्य सरकारची वेबसाइट असो किंवा केंद्र सरकारची वेबसाइट कोठेही होऊ शकतो. हा हल्ला लवकरच होण्याची शक्यता आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तो टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सांगितले आहे.

हे ही वाचा:

अमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

हॅकर्स डिनायल ऑफ सर्व्हिस आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ल्यांची योजना आखत आहेत. हॅकर्सनी लक्ष्य बनवण्‍यासाठी संगणक नेटवर्कवरील ट्रॅफिक अचानक वाढवण्‍याची योजना आखली आहे. त्यामुळे ते नेटवर्क क्रॅश धोका असून, त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या १४ सी विभागाने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सायबर हल्ला रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

Exit mobile version