गळ्यात पाट्या अडकवलेले गुंड आणि त्यांची पोलिसांनी काढलेली वरात असा प्रसंग आपण मुळशी पॅटर्न चित्रपटात पाहिला आहे. लोकांनी तो डोक्य़ावर घेतला होता. अशीच काहीशी घटना लातूरमध्ये घडली. मुलीवर हल्ला करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी पोलिस ठाण्यात तर नेले पण गाडीतून नव्हे. रस्त्यावरून त्याला थोबडवत, त्याला काठीने मारत त्याची पोलिस ठाण्यापर्यंत वरात काढण्यात आली.
ही घटना घडली ती लातूरमध्ये. १८ वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेला गौस मुस्तफा या २२वर्षीय गुंडाने १४ मार्चला एका तरुणीच्या तोंडावर ठोसा मारून तिला जखमी केले होते. छोट्याशा कारणावरून त्याने या मुलीवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याची रस्त्यावरून चक्क वरात काढली. महिला पोलिस अधिकारी त्याला काठीने मारत होत्या तर पुरुष पोलिसांनी त्याच्या थोबाडीत लगावली. असे मारत मारत त्याला लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
ही घटना घडली १४ मार्चला. सदर पीडित मुलगी खाद्यपदार्थ आणण्यासाठी ज्ञानेश्वर विद्यालयाच्या जवळच गेली होती. तेव्हा गौस मुस्तफा तिथून फोनवरून बोलत चालला होता. त्याने त्या मुलीला धक्का मारला. तेव्हा मुलीने त्याला विचारणा केल्यावर त्याने त्या मुलीला तोंडावर ठोसा लगावला. ती मुलगी त्यात जखमी झाली. गौसविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमधील जवानही रंगात न्हाऊन निघाले
… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा
जावेद भाई और सलीम भाई का मिलन जल्द
बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरच्या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध
पोलिसांनी त्या गौसचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो ज्ञानेश्वर नगरला येणार असल्याचे कळले. त्याला पकडून पोलिस व्हॅनने आणण्याऐवजी पोलिसांनी रस्त्यानेच खेचत आणले. त्या दरम्यान या पोलिसांत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्याला काठीने बडवून काढले. गौस मुस्तफाविरोधात विवेकानंद पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर या प्रकरणी ३२४ हे कलम लावण्यात आले आहे.