प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवालाच्या हत्येमागील मास्टरमाइंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत कॅलिफोर्निया पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. गुप्त माहितीनुसार, गोल्डीला २० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे.
गोल्डी ब्रारला ताब्यात घेतले आहे अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर भारतीय तपास संस्था अमेरिकन एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. गोल्डी ब्रारविरुद्ध दोन जुन्या प्रकरणांमध्ये यापूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. आश्रयासाठी गोल्डी ब्रार काही दिवसांपूर्वी कॅनडाहून कॅलिफोर्नियाला पळून गेला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून गोल्डी ब्रार कॅनडातून गुन्ह्यांची सूत्र हलवत होता. कॅनडामध्ये बसूनच तो भारतात खून आणि तस्करीचे काम करत होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडाचा कटही गोल्डी ब्रारनेच रचला होता. आपल्या गुंडांकडून सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो अमेरिकेत पळून गेला. मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्या वतीने एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये त्याने मुसेवाला याच्या हत्याकांडाचा कट रचल्याचे कबुल करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री शिंदेंनी दिला जत तालुक्याला न्याय
मुंबई मेट्रो-३ ने मिळवले हे नवे यश
स्वच्छता मोहिमेची CPL रंगतेय! ३५० स्वयंसेवक झाले सहभागी
मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !
दरम्यान, सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गुंडांनी त्याच्या वडिलांना लक्ष्य केले होते. मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांना कुख्यात गँगस्टर लॉरेन्स गँगकडून धमकी देण्यात आली होती.