अमृतसर: सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहेबच्या विटंबनेचा प्रयत्न

अमृतसर: सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहेबच्या विटंबनेचा प्रयत्न

पंजाब मधील अमृतसर येथील प्रसिद्ध अशा सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहेबच्या विटंबनेचा प्रयत्न झाल्याची बातमी पुढे येत आहे. एका युवकाने गुरुग्रंथ साहेब येथे जात तलवार उपासल्याचे पाहायला मिळाले तर यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी या युवकाला चांगलेच बदडले. त्यात त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या मागे काहीतरी कारस्थान असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शनिवार, १८ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. अमृतसर येथील पवित्र सुवर्ण मंदिरात हा युवक घुसला होता. सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या ग्रीलला ओलांडून हा युवक गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथापाशी पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने तलवार उपसली. हा संपूर्ण घटनाक्रम पाहिल्यावर तिथे उपस्थित भाविक सतर्क झाले. त्यांच्यासाठी हा सारा प्रकार धक्कादायक असला तरीही तो पाहून तिथल्या भाविकांचा संताप झाला. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्यांनी त्या युवकाला अडवले आणि मारहाणीस सुरवात केली. या मारहाणीत त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस कार्यकर्ता?

आमदार अतुल भातखळकरांचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल! मुख्यमंत्री देणार का उत्तर?

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉ.महेश मेहता यांचे निधन

दरम्यान या प्रकरणात कोणता तरी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पंजाब मधील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तर या घटने मागचे सत्य समोर यावे अशी मागणी केली जात आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक ही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना त्या पार्श्वभूमीवर या घटनेचे गांभीर्य अधिक आहे.

Exit mobile version