मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

मुंबई कस्टम पथकाची कारवाई

मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कस्टम पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई सीमा शुल्क विभागाच्या पथकाने विमानतळावर सोमवारी १९.१५ कोटी रुपयांचे ३२.७९ किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी दोन परदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावर दोन परदेशी महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांची तपासणी केली असता पथकाला दोन्ही महिलांच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि बॅगेजमध्ये लपवून ठेवलेले सोने सापडले. पथकाने कारवाई करत दोन्ही महिलांकडून ३२.७९ किलो सोने जप्त केले.जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १९.१५ कोटी रुपये इतकी आहे. पथकाने दोन्ही परदेशी महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा:

भारत- पाक सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे वाढवले मनोधैर्य

ही तर काँग्रेसची लाचखोरीची गॅरंटी?

राष्ट्रपती भवनात शपथविधीला पोहचला बिबट्या? व्हिडिओ व्हायरल !

‘ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अथलेटिक्स’च्या खेळाडूंची दमदार कामगिरी!

दरम्यान, अलीकडच्या काळात भारतातील विविध विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटना वारंवार घडत आहे.सोने, ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर सीमाशुल्क विभाग करडी नजर ठेवून कारवाई करत आहेत. यापूर्वी ७ जून रोजी चेन्नई विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३.९१ कोटी रुपयांचे २४ कॅरेट शुद्धतेचे ६ किलो सोने जप्त केले होते. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने ही कारवाई केली होती.

Exit mobile version