नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !

कस्टम विभागाची मोठी कारवाई

नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !

नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कतारवरुन नागपूर विमानतळावर आलेल्या दोन जणांना अटक केली आहे. कस्टम विभागाकडून कारवाई करण्यात आली. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या दोघांची नावं असून हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत.त्यांच्याकडून ८७ लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

गणपतीला जाणाऱ्या गाडीला समृद्धीवर अपघात, १ मृत्युमुखी

तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !

कस्टम्स विभागातील अधिकाऱ्यांना दोघेजण सोन्याची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.आरोपी मंगळवारी पहाटे कतर मधून आलेल्या विमानातून ते नागपूर विमानतळावर दाखल झाले होते.त्यानंतर कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्या दोघांची तपासणी केली असता दोघांनी शरीरावर घातलेल्या कपड्यात पावणे दोन किलो सोनं पेस्ट स्वरूपामध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले.त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.एवढ्या मोठ्या प्रमाणावर
या सोन्याची तस्करी कोठे केली जाणार होती याचा तपास सुरु आहे.

 

Exit mobile version