अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाची कारवाई

अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आल्या आहेत. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. अशातच अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने- चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी चालले होते. अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने त्यांची गाडी अडवून चौकशी केली असता उपस्थित असलेल्या सर्वांनी वेगवेगळी माहिती दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत चांदीची चाळीस किलोची वीट, सोन्याची बिस्किटे, तर एकूण ५३ किलो चांदी, हिरे- मोत्यांचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. तपासणीत १४ अधिकृत पावत्याही आढळून आल्या पण, वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. कारवाईतील सोन्या- चांदीच्या विटांसह इतर सोने, हिऱ्याचे दागिने आयकर विभागाकडे जमा करण्यात आले आहे. बिलांची खात्री केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया सुरू

दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट

बलुचिस्तानमध्ये स्फोट; शाळकरी मुलांसह पाच जणांचा मृत्यू

‘अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, राऊत आणि पटोले शांत’

दरम्यान, गुरुवारी मुंबईच्या कुलाब्यातून १० कोटी किंमतीचे डॉलर्स ताब्यात घेण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान ही रक्कम आढळली आहे. मात्र ही रक्कम मर्चटांईन बँकेची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे परदेशी चलन भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती आहे.

Exit mobile version