मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज सोने तस्करी करणाऱ्या तब्बल १८ महिलांना हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले आहे. या महिला केनियन असून अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून ४ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत तब्बल ३.८५ कोटी इतकी आहे.
केनियन महिला एकाच विमानातून शारजामार्गे नैरोबीहुन भारतात आल्या होत्या अशी माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या महिलांनी अंतर्वस्त्र, केसांचा विग, शूज आणि खाण्यापिण्याच्या सामानात हे सोने लपवले होते. १.५५ किलो सोन्याचे बारही या महिलांच्या सामानातून जप्त करण्यात आले.
हे ही वाचा:
का आहे म्हशीची किंमत ८० लाख??? वाचा सविस्तर…
तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!
तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त
पनामा प्रकरणी ऐश्वर्या राय हिला ईडीचे समन्स
हवाई गुप्तचर विभागाने आतापर्यंत एका महिलेला अटक केली आहे. परवानगीपेक्षा अधिक सोने बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर उर्वरित १७ महिलांच्या ताब्यातील सोने जप्त करुन त्यांना सोडून देण्यात आल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. या महिला गरीब कुटुंबातील आहेत. केनियात सोन्याच्या किमती स्वस्त असल्याने तिथे त्यांनी सोन्याची खरेदी करून मुंबईत सोन्याचे भाव प्रचंड जास्त असल्याने चढ्या दराने विकण्याचा त्यांचा प्लॅन होता असे वृत्त आहे.
गेल्याच महिन्यात दुबईहून १.७१ किलो वजनाचे ७७ लाख रुपये किंमतीचे सोने तस्कर केल्याप्रकरणी दोघा प्रवाशांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते.