महसूल गुप्तचर संचालनालयाला मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने मुंबई विमानतळावरून बुधवारी दोन तस्करांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडून ८.२३० किलो सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली असून, त्याची किंमत ४.५४ कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या किमतीत सोन्याची पेस्ट मिळाल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने दोघांनाही अटक केली. दोघांची चौकशी सुरू आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाला सूत्रांनी सांगितले की, दुबईहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची एक टोळी पेस्टच्या स्वरूपात सोन्याची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती त्यांच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार,महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लक्ष ठेवून होते. १७ जानेवारीच्या रात्री उशिरा विमानतळावर दोन संशयित प्रवासी दिसू लागताच त्यांना थांबवण्यात आले. दोघांची कसून झडती घेतल्या.
Mumbai | Two passengers who arrived from Dubai today were arrested at Mumbai airport for carrying gold weighing around 8 kgs in paste form worth Rs 4.54 crores. Investigation underway: DRI (Directorate of Revenue Intelligence) pic.twitter.com/i1WMPuRa6H
— ANI (@ANI) January 17, 2023
अंतर्वस्त्रात लपवले होते सोने
जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या स्वतःच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवले गेले होते. त्यामुळे ते शोधणे खूप कठीण होते. दोन्ही प्रवाशांना तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे असे अधिका-याने सांगितले. या टोळीत किती लोक सामील आहेत, याची माहिती गोळा केली जात आहे. पेस्ट स्वरूपात ८.२३० किलो सोने जप्त करण्यात आले. सोन्याची किंमत अंदाजे ४.५४ कोटी रुपये असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक
चपलांमधून सोने जप्त
जयपूर विमानतळावरही अशीच एक घटना घडली डिसेंबर रोजी घडली होती.. जयपूर विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे आरोपी प्रवाशाच्या चपलामधून १४,१९,८६० रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. चपलाच्या आकारानेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. अधिकाऱ्यांना प्रवाशाचे वर्तन काहीसे संशयास्पद वाटले . सीमाशुल्क विभागाने प्रवाशाचा बूट काढला असता त्यात २५४ ग्रॅम सोने आढळून आले.