निंदनीय !! पाकिस्तानात बकरीवर बलात्कार करून हत्या

निंदनीय !! पाकिस्तानात बकरीवर बलात्कार करून हत्या

मथळा वाचून धक्का बसला ना. पण हे चीड आणणारे वास्तव आहे. पाकिस्तानात आता महिलाच काय बकऱ्याही सुरक्षित नाहीत. एका बकरीवर बलात्कार करून त्या बकरीची हत्या करण्यापर्यंत पाकिस्तानात वासनांधांची मजल गेली आहे. या घटनेने पाकिस्तानात नीतिमत्तेच्या पार चिंधड्या उडाल्या आहेत.

महिला ज्या पद्धतीने कपडे परिधान करतात, त्यामुळेच त्यांच्यावर अत्याचार होतात. पुरुषांवर त्याचा प्रभाव पडतो कारण ते रोबोट्स नाहीत, असे निर्लज्ज विधान करणारे इम्रान खान यांनी आता बकऱ्यांनी काय करावे या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून होऊ लागली आहे.

या घटनेसंदर्भात जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार पाच जणांनी एका मजुराची बकरी पळवली आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर शेवटी तिला ठारही मारले. स्थानिकांनी या पाच जणांना हे कृत्य करून पळताना पाहिले. या पाच जणांना बकरीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर पाकिस्तानात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचे आसूड ओढले जात आहेत. आता बकऱ्यांचे राहणीमान कसे असले पाहिजे, हे इम्रान खान यांनी सांगावे, अशी विचारणा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. पाकिस्तानची अभिनेत्री मथिराने म्हटले आहे की, आता बकऱ्यांनाही बुरखा घालण्याची गरज आहे का?

आणखी एकाने ट्विटरवर विचारले आहे की, नग्न प्राण्यांचाही पुरुषांवर परिणाम होऊ शकतो? आता निष्पाप पुरुष हे रोबोट्स नसल्यामुळे आपले रुबाबदार पंतप्रधान बकऱ्यांनाही अंग झाकून घेण्यास सांगतील.

पाकिस्तानात वाढलेले बलात्कार आणि त्यानंतर होणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे आधीच लोकांमध्ये प्रचंड क्षोभ आहे. त्यात आता या घटनेमुळे लोक अधिकच संतापले आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुख यांची अटक निश्चित

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला

एसटीच्या बसेसवर फवारणीची उधळपट्टी…वाचा, किती होणार खर्च?

इस्लामाबादमध्ये नूर मुकादम या महिलेवर अत्याचार करून तिचा शिरच्छेद करण्यात आला होता तर २०१८मध्ये एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या झाली होती. गेल्या वर्षी एका महिलेवर तिच्या मुलांसमक्ष बलात्कार करण्यात आला होता.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते लैंगिक समानतेच्या बाबतीत १५६ देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक १५३वा आहे तर दक्षिण आशियात ८ देशांत सातव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.

 

Exit mobile version