29 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामाविद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढून कपडे उलट घालायला लावले

विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढून कपडे उलट घालायला लावले

नीट परीक्षा काळात सांगलीत विद्यार्थिनींशी गैरवर्तन

Google News Follow

Related

रविवारी देशभरात नीट परीक्षा पार पडली. पण सांगलीमध्ये झालेल्या नीट परीक्षेच्या दरम्यान लाजिरवाणा आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्याचा प्रकार घडला. या मुलींनीच अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले.

या संतापजनक निंदनीय प्रकारचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थिनीच्या पालकांनी पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. सांगली शहरातल्या कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला. परीक्षेसाठी येणा-या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थिनींना आणि सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आपले कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालून परीक्षा द्यावी लागली.

परीक्षा झाल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरचे उलटे कपडे पाहून पालखी बुचकळ्यात पडले. पालकांना याबाबत विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!

ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार दाखल केली. सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून त्यांचा या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली हाेती. प्रशासनाने हात वर केल्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा