23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामामुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या

मुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या

Google News Follow

Related

मुंबईमधील कुर्ल्यामध्ये बलात्कार करून एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना कुर्ला येथील एचडीआयएल कंपाउंडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर या तरुणीचा मृतदेह आढळून आला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तरुणीचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालातून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

सीआयडीकडून परमबीर यांना दोन समन्स

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी

वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसला; ६ ठार

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

काही तरुण त्यांच्या इन्स्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी एचडीआयएल कंपाउंडमधील बंद असलेल्या इमारतीवर गेले असता त्यावेळी त्यांना टेरेसवर तरुणीचा मृतदेह दिसला. तरुणांनी तातडीने यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत तपास सुरु करून अद्याप या तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलीस परिसरात कोणी बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का? याची तपासणी करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा