नवी ‘केरळ स्टोरी’; तरुणीने मदरशात लावून घेतला गळफास

आईने केली होती तक्रार, मानसिक छळ होत असल्याचा आरोप

नवी ‘केरळ स्टोरी’; तरुणीने मदरशात लावून घेतला गळफास

केरळच्या बलरामपुरम येथील मदरशात एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या तरुणीच्या आईने मदरशात आपल्या मुलीचा मानसिक छळ झाल्याची तक्रार केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असमिया मोले असे या तरुणीचे नाव असून ती तिरुवनंतपुरमच्या बीमपल्ली भागातील रहिवासी होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक असमिया मोले हिने शनिवारी १३ मे रोजी दुपारी आईला फोन करून घरी परत नेण्यास सांगितले. त्यानंतर तिची आई दुपारी ४.३० वाजता बलरामपुरम येथील मदरशात पोहचली. त्यांनी मदरसा व्यवस्थापनाकडे आपल्या मुलीला परत नेण्याची परवानगी मागितली. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता असमियाच्या आईला सांगण्यात आले की, त्यांच्या मुलीने मदरशाच्या लायब्ररीत गळफास घेतला आहे. त्यानंतर असमियाच्या आईने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मृतक तरुणीच्या आईने पोलिसांत मानसिक छळाची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:

दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरेंचे स्वप्न आजही जिवंत

मंत्रिमंडळ बैठकीत अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासह घेतले ‘हे’ निर्णय

बेदरकारपणे वाहन चालवलेत तर जामीन मिळणार नाही

नवीन पटनाईक यांच्या मनात चाललेय काय?

मृतक तरुणीचे काका ताजुद्दीन यांनी सांगितले की, मुलगी रमजानच्या वेळी घरी आली होती आणि तिने तिच्या आईला सांगितले होते की एक नवीन मदरसा शिक्षक तिला त्रास देत आहे. तसेच २ मे रोजी मदरशात परतल्यावर तिने पुन्हा आईकडे त्या शिक्षकाबाबत तक्रार केली होती.

Exit mobile version