मुस्लिम धर्म सोडून हिंदु धर्म आपलासा करणाऱ्या २३ वर्षीय मुलीने तिचे नातेवाईक आणि मौलाना यांनी दिल्लीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मौलानाकडून मशिदीत मुलींवर बलात्कार केला जात असे, याची ही मुलगी व्यक्तीशः साक्षीदार असल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळेच तिने इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.
तिचे चार मामा आणि मौलाना यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. नंतर चार बुरखाधारी सशस्त्र मुलांनी तिला दिल्लीतच नग्नावस्थेत सोडले. ही घटना १३ मार्च २०२४ रोजी घडली. पोलिसांनी या प्रकरणी जुनी दिल्ली पोलिस ठाण्यात या प्रकरणी १७ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.
ही पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती मुंबईत राहात असून ती मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनर म्हणून काम करते आहे. तिच्या वडिलांचे सन २०१२मध्ये देहावसान झाले होते. तर, ती तिची आई आणि दोन बहिणींसह तिच्या मूळ गावातच राहात होते. तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ती मुरादाबाद जिल्ह्यातील देप्पूर या तिच्या मामाच्या गावी राहू लागली. तिथे ती मदरशामध्ये शिक्षण घेत होती.
तिच्या आईचे वडील म्हणजेच तिचे आजोबा अन्वर हुसैन आणि मामा मेहबूब अली यांच्या मालकीची मोरादाबाद जिल्ह्यात ३५० एकर जमीन होती. आजोबा आणि मामाच्या निधनानंतर पीडितेची आईच या जमिनीची वारस होती. मात्र तिच्या आईची चुलतभावंडे इम्तियाज, इरफान, अफसर आणि असर हुसैन यांनी ही जमीन त्यांच्या नावे करण्याचा तगादा लावला. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार तिची आई तब्बल १४ वर्षे त्यांच्या नियंत्रणात होती. जेव्हा पीडित मुलीला मुंबईत नोकरी मिळाली, तेव्हा तिने तिच्या आईची त्यांच्या ताब्यातून सुटका केली.
हे ही वाचा:
पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’
पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल
आरोग्य विभागासाठी अरविंद केजरीवालांनी ईडीच्या कोठडीतून काढला दुसरा आदेश
धाराशिवमध्ये दोन गटात राडा; १२५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल
पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, ही पीडित मुलगी २९ फेब्रुवारी रोजी जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी मोरादाबाद येथे आली होती. न्यायालयात जात असताना तिचे मामा इम्तियाज, इरफान, असर आणि असरार हुसैन यांनी तिचे अपहरण केले आणि तिला त्यांच्या गावात नेऊन तिला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दोन दिवस हा अमानुष छळ सुरू होता. तिने हिंदू देवतांचा टॅटू काढला होता, तिथेही तिला मारहाण करण्यात आली. बलात्कारानंतर तिला नग्नावस्थेत दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवण्यात आले. तिथे चौघा मुले तिच्यासोबत बुरखा परिधान करून बसले होते. मात्र त्यांच्याकडे शस्त्रे होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
तिने कशीबशी स्वतःची सुटका करून पोलिस ठाणे गाठले. नंतर हा गुन्हा उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये हस्तांतरित करण्यात आला. तिला रेल्वेरुळांवर फेकून तिची हत्या करण्याचा कट होता, असा दावा तिने केला आहे. तिचा जीव वाचल्याबद्दल तिने भगवान श्रीकृष्णाचे आभार मानले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पीडितेच्या वकील संगीता तलवार यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी हिंदू धर्मात प्रवेश
या पीडितेने गेल्या वर्षी घरवापसी करून हिंदू धर्मात प्रवेश केल्याचा दावा केला आहे. नादेरबाग येथील माडिया भागातील जामिया मशिदीतील इमाम मुलींचा पुरवठा करत असे आणि त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचे तिने व्यक्तिशः पाहिले होते, असा दावाही तिने केला. इमामच्या निवासस्थानी अनेक कंडोम असल्याचे तिने पाहिले होते आणि तिने त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला होता, असे ओपइंडिया या वृत्त वेबसाइटचे म्हणणे आहे.